CRIME STORY "त्या" खून प्रकरणाचे गूढ उकलले! समलैंगिक संबंधातून झाला प्रदीप चा खून; आधी सोपानशी ठेवायचा संबंध नंतर सोपानच्या बायकोसोबतही तेच करायचा; गे - ग्रुपच्या माध्यमातून झाली होती ओळख.!

प्रदीप जालना येथील एका बँकेत वसुली अधिकारी म्हणून नोकरीला होता. उंबरखेड येथून दररोज जालना येथे येणे जाणे करायचा. अडीच वर्षांआधी प्रदीप ची एका "गे ग्रुप" च्या माध्यमातून सोपान शी ओळख झाली. ओळखीतून दोघांचे प्रेमसंबंध आणि त्यातून शारीरिक संबधाचे सुत जुळले. नोकरी निमित्ताने प्रदीप जालना येथे येणे जाणे करायचा. अधून मधून समलैंगिक शारीरिक संबंधाची इच्छा झाल्यावर तो सोपानच्या मंठा येथील घरी जायचा आणि तिथे दोघेही समलैंगिक संबंध ठेवायचे.
सोपानच्या पत्नीसोबतही..!
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आधी सोपान आणि त्यानंतर सोपानच्या बायकोशी शारीरिक संबंध प्रदीप ठेवू लागला. अर्थात सोपानची देखील त्या संबंधाला काही हरकत नव्हती असे आता बोलल्या जात आहे. मात्र ७ एप्रिलला त्यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. सोपानने त्याच्या मित्रांना बोलावले आणि प्रदिपला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रदीप चा जागीच मृत्यू झाला. सोपान ने त्याच्या भावाच्या मदतीने मृतदेह मंठा बाजार समितीच्या आवारात फेकून दिला.
पोलिसांना तपास करतांना काही कॉल, व्हिडिओ कॉल आढळले. काही फोटोंच्या माध्यमातून प्रदीप कायंदे आणि सोपान चे समलिंगी संबंध असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी सोपानची कसून चौकशी केली. त्यानंतर हे सगळे कांड समोर आले.