कंटेनरने बस चराचरा कापली! झोपेत असलेल्या प्रवाशांना कळालच नाही काय झालं! रक्ताच्या चिरकांड्या अन् यातनेचा कल्लोळ; अपघातातील मृतांची संख्या झाली ९;

व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडेल! वाचा अपघातातील मृतकांची नावे..

 
fghj
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २३ मे ची आजची सकाळ बुलडाणा जिल्हावसियांसाठी वाईट बातमी घेऊन उजाडली. मेहकर सिंदखेडराजा रस्त्यावर पळसखेड चक्का गावाजवळ सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या ठोक्याला कंटेनर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात घटनास्थळी ७ जणांचा मृत्यू झाला होता, आता मृतकांची संख्या वाढली असून उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने ही संख्या ९ झाली आहे. अपघाताचे वेगवेगळे व्हिडिओ ,फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते काळजाचा थरकाप उडविणारे आहेत.
 

 मेहकर कडून सिंदखेडराजाकडे जाणारे कंटेनर आणि पुण्यावरून मेहकर येथे असलेली मेहकर आगाराच्या बसची पळसखेड चक्का गावाजवळ समोरासमोर धडक झाली. बस मध्ये चालक आणि वाहक असे मिळून ३३ जण होते. अपघातावेळी बहुतांश प्रवाशी झोपेत होते, त्यामुळे अपघातानंतर नेमक काय झालं हे अनेकांना कळाल नाही तर काहींना हे कळायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला होता. रक्ताच्या चिरकांड्या, यातनेचा कल्लोळ असेच चित्र घटनास्थळी होते. कंटेनरने बस अक्षरशः चराचरा कापली. बसमध्ये चालकाच्या बाजूला बसलेले प्रवाशी या अपघातात जास्त गंभीर जखमी झाले. कंटेनर आणि बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २३ प्रवाशी जखमी आहेत, त्यातील काहींनी प्रकृती चिंताजनक आहे. सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर काही जखमींना जालना तर काहींना छत्रपती संभाजीनगरात उपचारासाठी पाठवले आहे.

अपघातातील मृतांची नावे..

शेषराव उत्तमराव खराबे (६५, रा. अंत्री देशमुख, ता.मेहकर), राजू तुकाराम कलाल( बस चालक, ४२, रा.वडगाव तेजन ,ता लोणार), सौ. कर्णा रामदास खिल्लारे(४५, रा. केळवद, ता.बुलडाणा), वनमाला किशोर पवार(३०, रा.बेलगाव, जि.वाशिम),सीमा रामेश्वर सोळंकी (५०,रा.मेहकर)

( उर्वरित मृतकांची नावे अद्याप कळू शकली नाहीत, कळाल्यानंतर ती अपडेट केली जाईल)