स्मशानभूमीच्या रस्त्यात बांधकाम! नातेवाईकांचे तिरडीसह रस्त्यावर ठाण! ...अखेर रस्त्यावरच झाले दहन; धोडप मध्ये तणाव...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील धोडप मध्ये आज,१८ मार्चच्या दुपारी वातावरण चिघळले होते. स्मशानभूमीच्या रस्त्यात एका बहाद्धराने बांधकाम केल्याने एका इसमाचे अंत्यसंस्कार रखडले. यामुळे शोकाकुल नातेवाईक गावकऱ्यांनी तिरडीसह रस्त्यावरच ठाण मांडले. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर नातेवाईकांनी रस्त्यावरच मृतदेहाचे दहन करून अंत्यसंस्कार केले. गावात तणाव सदृश्य परिस्थिती आहे
 जिल्ह्यातील धोडप (तालुका चिखली) येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचा आज सोमवारी मृत्यू झाला . अंत्यविधीसाठी त्यांची तिरडी स्मशानभूमीत नेत असताना सरकारी रस्ताच गावातील एका व्यक्तीने अडवून ठेवलेला दिसला त्याठिकाणी रस्त्यात भिंत बांधली, लोखंडी गेट लावले असल्याने ग्रामस्थांना स्मशानात जाणे अशक्य ठरले. सोयरे व ग्रामस्थानी संबंधित व्यक्तीला रस्त्यातील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली मात्र तर हटवण्यास तयार नसल्याने ग्रामस्थानी आणि नातेवाईकांनी श्रीराम कोल्हे यांचे प्रेत रस्त्यातच ठेवत ठाण मांडले. काही तास वादंग झाल्यावरही तोडगा निघाला नाही. यामुळे संताप अनावर झालेल्या नातेवाईकांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले.