शेगावच्या काँग्रेस नेत्याची आत्महत्या! शेतात घेतला गळफास! "या" कारणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा

 
crime
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती पुंडलिक दत्तू पारस्कर(४९) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज,२३ मार्चला  दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना  उघडकीस आली.

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  काँग्रेसचे नेते व २००७  ते २०१२ पर्यंत शेगाव पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले पारस्कर अतिशय मनमिळाव स्वभावाचे होते. मात्र कर्जबाजारीपणामुळे त्यांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.