बुलडाणा विभागातील एसटी महामंडळातील वाहतूक नियंत्रक बढती प्रक्रियेत घोळ! कर्मचाऱ्यांनी आरोप! देवाण-घेवाण होत असल्याचाही संशय!

आमदार रायमूलकरांनी विभाग नियत्रकांना झापले;म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करीन....
 
busstand
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बऱ्याच वर्षानंतर तोट्यातून नफ्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे मेहनत करणाऱ्या चालक वाहकांत मात्र कमालीची नाराजी दिसून येत आहे. मेहकर आगारातील वाहतूकांनी विभागीय नियंत्रकांना एक निवेदन दिले असून त्यात सेवाज्येष्ठता डावलून वाहतूक नियंत्रक या पदावर  मर्जीतील लोकांना बसविण्याचा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकियेत मोठी आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय. यामुळे एसटी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
 

 सविस्तर असेकी एसटी महामंडळामध्ये अधिकाऱ्यांच्या कमतरतेनुसार चालक व वाहकांना तात्पुरती बढती देण्यात येते.त्यानुसारच बुलडाणा विभागात वाहतूक नियंत्रक पदाची तात्पुरत्या बढतीसाठी प्रत्येक डेपोतून इच्छुक वाहकांचे अर्ज मागविण्यात आले होते. इच्छुक वाहकांनी खात्याच्या मागणीनुसार वेळोवेळी अर्ज सुद्धा सादर केलेले आहेत.परंतु त्यामध्ये सेवा जेष्ठता डावलून काही ठराविक संघटनांच्याच लोकांना म्हणजे स्वर्मजीतील लोकांना फायदा पोहोचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे  अशा आशयाचे निवेदन मेहकर आगारातील तब्बल १९ वाहकांनी आपल्या  आगार व्यवस्थापकामार्फत विभाग नियंत्रक बुलडाणा यांना दिले आहे.व त्याची प्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,परिवहन मंत्री,खासदार,आमदार,जिल्हाधिकरी सह महाव्यवस्थापकांना दिल्या आहेत.
            निवेदनात नमूद असल्याप्रमाणे बुलडाणा एसटी कार्यालयातून निघालेले विभागीय आस्थापना आदेश क्रमांक 2032/2023 जा.क्र./रा.प./आव्य/मेहकर/दृशा/2198 आगार व्यवस्थापक यांचे कार्यालय रा.प.मेहकर दि.20/12/2022 च्या पत्राचा आदेश रद्द करून सेवा जेष्ठतेनुसार वाहतूक नियंत्रकपदी बढति मिळावी अन्यथा आगार पातळीवर तीव्र आंदोलन करू.तसेच न्यायालयीन लढा लढू व होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी जबाबदार विभाग नियंत्रक राहतील.असा तीव्र इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
        सदर निवेदन मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांनी मेहकर मतदार संघाचे आमदार श्री संजय रायमुलकर यांना देताच त्यांनी सदर प्रकरणाची विभाग नियंत्रक यांचेकडे फोनवरून चौकशी केली. सेवाज्येष्ठता डावलून मर्जीतील लोकांना बढती मिळत  असल्यास तो आदेश रद्द करण्याच्या सूचना केल्या. अन्यथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे कडे तक्रार करणार असल्याचे आ. रायमुलकर म्हणाले.सदर बढती प्रक्रियामागे फार मोठी देवाण-घेवाण असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांकडून होत असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य कार्यवाही व्हावी.अशी मागणी मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.