आ. संजय गायवाडांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या कारला अपघात! इनोव्हा निंबाच्या झाडाला धडकली

 
Dhg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या कारला अपघात झाल्याची घटना काल, ८ मार्चच्या रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. मोताळा येथून बुलडाण्याकडे परत येत असताना खडकी फाट्याजवळ हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून ते बालबाल बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Kute

    जाहिरात👆

प्राप्त माहितीनुसार कुणाल गायकवाड व त्यांचे सहकारी मोताळा येथे एका सांत्वन भेटीसाठी गेले होते. दरम्यान रात्री बुलडाणा येथे परत येत असतांना खडकी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने इनोव्हा कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या निंबाच्या झाडाला जाऊन धडकली. यावेळी कुणाल गायकवाड यांनी सीट बेल्ट लावलेला असल्याने ते थोडक्यात बचावले. अपघातात त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.