सिनेस्टाईल पाठलाग करत अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले!

 
Tipper
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डोणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला असून, मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी २१ मेच्या रात्री सिनेस्टाइल पाठलाग करून एक टिप्पर पकडले. हे टिप्पर कारवाईसाठी डोणगाव पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे.
मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके, डोणगाव तलाठी अनुप नरोटे व अमोल राठोड व सुरक्षा रक्षक बोराडे हे डोणगांव ते मेहकर रोडवर जात असताना त्यांना एक रेतीने भरलेला टिप्पर डोणगाव कडे जाताना दिसला. या पथकाने त्याचा पाठलाग करून नागापूर जवळ त्याला थांबवून तहसीलदार नीलेश मडके यांनी टिप्पर चालक विजय छगन जाधव रा. मंठा यास चौकशी केली असता त्याने वेळ झालेली पावती दाखविली. टिप्पर क्रमांक विचारला असता त्याने एमएच २१ बीएच ४३३३ असा सांगितला आहे.