Amazon Ad

चंदनपुर हत्याकांड प्रकरणी सकल हिंदु समाज आक्रमक! चिखलीत तहसील कार्यालयावर काढला मोर्चा; ठाणेदारांनी तपासात हलगर्जी केल्याचा आरोप;

इन कॅमेरा पोस्टमार्टम न केल्याचा मुद्दा गाजला! ठाणेदारांच्या निलंबनाची मागणी! अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे १३ ऑक्टोबरच्या रात्री पश्चिम बंगालच्या अल्पवयीन करण्याची हत्या करण्यात आली होती. २४ तासांनी पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी सकल हिंदू समाजाने याप्रकरणी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. हा "लव्ह जिहाद"चा धक्कादायक प्रकार असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला असून ठाणेदार विकास पाटील यांनी प्रकरणाचा तपास करतांना हलगर्जी केल्याचा आरोप केला आहे.
 

kfkf

ठाणेदारांनी घटनास्थळाचा पंचनामा करतांना व्हिडिओ चित्रीकरण केले नाही. पोस्टमार्टम करण्याची घाई केली, प्रकरण गंभीर असताना देखील ठाणेदारांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम का केले नाहीत असा सवाल सकल हिंदू समाजाने उपस्थित केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज,१८ ऑक्टोबरला चिखलीत सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला, यावेळी सरकारला, प्रशासनाला तहसीलदारांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ठाणेदारांवर कठोर कारवाई करा, या घटनेचा पुन्हा एकदा सखोल तपास करा अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभे करू असा इशारा हिंदू जागरण मंचाचे विभाग संयोजक हेमंत पिल्ले यांनी दिला.

मोर्चात आमदार श्वेताताई महाले यांच्यासह भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, दुर्गा पूजा वाहिनी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी देखील निवेदन देतेवेळी उपस्थित होत्या. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने दिलेले निवेदन स्विकारले असून जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचवण्यात येईल. या घटनेच्या तपासात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या दूर करण्यात येतील असे आश्वासन यावेळी तहसीलदार आणि ठाणेदार संग्राम पाटील आंदोलनकर्त्यांना यांनी दिले.

हिंदू जागरण मंचाचे हेमंत पिल्ले म्हणाले....