अंधारात लपाछपी करणाऱ्या दोघांना पकडले; शेगाव शहरातील घटना

 
सिल्लोडचा युवक देऊळगाव राजात येऊन अंधारात लपला!
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरीच्या उद्देशाने अंधारात लपाछपी करणाऱ्या दोघांना शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी) पकडले. काल, १० जानेवारीच्या पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटकेतील दोन्ही आरोपी अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शेगाव शहर पोलिसाचे गुन्हे प्रकटीकरण पथक काल रात्री पेट्रोलिंग करत होते. शहरातील सराफालाईनमध्ये दोघे जण तोंडाला रूमाल बाधून अंधारात दडून बसल्याचे त्‍यांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांना पकडले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या ते लपाछपी करत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय रतन पळसपगार (२७, गणोरी ता. अकोला) व जितेंद्र ऊर्फ देवा सुरेश संडे (२६, सुलतानपूर ता. अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.