बुलडाण्यात नायलॉन मांजा विकणाऱ्याला पकडले

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पक्षी, प्राण्यांसह माणसांनाही प्राणघातक ठरत असलेल्या आणि शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा विकणाऱ्या एकाविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून ४ हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला. आज, १५ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.
अतुल मनोहरराव जाधव (रा. तानाजीनगर, बुलडाणा) हा त्याच्या दुकानात शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची साठवणूक करून त्याची विक्री करीत होता. शहर पोलिसांनी दुकानावर छापा टाकून त्याच्या दुकानातील ४ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत.