नांदुऱ्यात बक्कळ रेतीसाठा पकडला! जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर होणार लिलाव..!

 
fghjkl

नांदुरा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  नांदुरा तालुक्यातील बाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी नांदुरा तहसीलदार डिगांबर मुकुंदे  ॲक्शन मोडवर आले आहेत. चोरटी रेती वाहतुक होत असल्याच्या मार्गावर स्वतः हजर राहून सात रेती वाहतुक करणाऱ्या गाड्या पकडून त्यांचेवर कारवाई करून ११ लाख ६२ हजार ४०० रुपये दंड ठोठावल्याने चाळू तस्करांमधे खळबळ उडाली आहे. दंडापैकी ८ लाख ५० हजार ४०० रुपये वसुल केले व दोन वाहने तहसील कार्यालयात उभी असुन त्यांचेकडुन प्रत्येकी १ लाख ५६ हजार रुपये प्रमाणे दंड वसुल करणे बाकी आहे. त्यांनी दंड भरल्याशिवाय रेती वाहतुक गाडी सोडली जाणार नाही तसेच त्यांचे सातबारावर दंडाची नोंद केली जाईल. सदर कार्यवाहीचा तपशील हा २९ मे पर्यंतचा आहे अशी माहीती तहसीलदार डिगांबर मुकुंदे यांनी दिली. 

प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सर्व अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे आदेश दिलेले आहे. ज्या ज्या भागातुन रेती वाहतूक होते. त्या मार्गावर २४ तास कर्मचारी ड्युटी लावण्यात आल्याचेही सांगीतले आहे. गाडी क्र. एमएच २८ बी ५६५१, एमएच ०६ जी ६२४४, एमएच २८ टी ९७६६, एमएच २८ एवी ७६३२, एमएच २८ एवी ७९४०, एमएच २८ एवी ७५५४, आयशर टॅक्टर सिल्वर कलरचे अशा रेती त्यांचे सात बारा उताऱ्यावर या दंडाचा बोजा चढवला जाईल. वाहतुक करणाऱ्या सात वाहणांवर कारवाई केली. दुसऱ्या घटनेत भोटा येथे ९१६ ब्रास रेतीचा अवेधा साठा पकडला, मौजे पातोंडा येथे ११७६ ब्रास रेतीचा साठा पकडला असून टाकळी वतपाळ येथे ६० ब्रास मोजे येरळी येथे ७९९ बास, जिगांव येथे ६३ ग्रास, बेलाड येथे ५२४ बास रेतीचा साठा पकडला आहे. त्यापैकी २०९२ ब्रास ७०५६०० रुपयाला विकली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परवागी दिल्यानंतर त्या रेतीची शासकीय ठेकेदारांकडून लिलाव करू अशी माहिती मुकुंदे यांनी दिली. टाकळी तपाळ, येरळी, जिगांव बेलाड येथील ११७६ बास रेती साठीही जप्त असून अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिलेली नाही.परवानगी दिल्यानंतर लिलाव केला जाईल अशी माहीती तहसीलदार डीगांबर मुकुंद यांनी दिली.