बुलडाण्यात रजा अकादमीच्या ३५० जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रजा अकादमीने काल, १२ नोव्‍हेंबरला जिल्हा बंद पुकारण्याबरोबरच शहरात दुपारी १२ ला धरणे आंदोलन करून नंतर चारला मोर्चा काढला होता. यात कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला. त्‍यामुळे अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसह ३५० कार्यकर्त्यांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी आज, १३ नोव्‍हेंबरला गुन्‍हा दाखल केला आहे.

त्रिपुरा राज्यात अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या अत्याचाराची उच्चस्तरीय न्यायालयीन  चौकशी व्हावी. धार्मिक स्थळांना आगी लावण्याच्या घटना थांबवाव्यात. त्रिपुरा सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी या मागण्यांसाठी रजा अकादमीने आंदोलन छेडले होते. सहायक पोलीस निरिक्षक नीलेश लोदी आणि पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू यांच्‍या तक्ररीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धरणे आंदोलनातील सहभागी रईसोद्दीन रफीउद्दीन काझी, सय्यद समिर सय्यद जहीर, समीर खान मेहमूद खान, शेख जावेद शेख इकबाल, शेख जुबेर शेख इकबाल यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे.

दुपारी चारला मोर्चा काढला. यातही कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला. त्‍यामुळे समीर खान नजमोद्दीन खान, शेख युनूस शेख मुसा, युनूस खान भिकन खान, शेख जावेद शेख नवाब, मोबीन खान अय्युब खान, शाकीर खान ताहेर खान, युसूफ खान आझाद खान, कलीम खान रज्जाक खान, राजा खान तस्लीम खान, शेख नईम शेख रहिम यांच्यासह दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.