सुखसागर हॉटेल समोर मालवाहू अँपे पल्टी ; 1 युवक ठार , शेगांवची घटना!

 
आप्पे
शेगाव(बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा ) :  शेगांव येथील शेगाव - खामगाव रोडवर असणाऱ्या हॉटेल सुखसागर  समोर मालवाहू अँपे पल्टी झाल्यामुळे 1 युवक ठार झाल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली.
खामगाववरून शेगाव कडे येणारा लाल रंगाचा मालवाहू अँपे क्र.एमएच-14-एफटी-1463 हा चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पल्टी झाला त्यामध्ये असलेला खेर्डा गोसावी येथील 27 वर्षीय युवक पुरुषोत्तम पुंजाजी गावंडे हा गंभीर जखमी झाला. अपघात झालेल्या घटनास्थळा वरून गंभीर युवकाला येथील माऊली मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैधकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. तदनंतर मृत व्यक्तीस शवविच्छेदणासाठी स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाता नंतर शेगाव पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे.