छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या निषेधार्थ हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने आज "चिखली बंद" चे आवाहन! मेरा खुर्दच्या "त्या" चौघांना औरंगजेबाचा आला होता पुळका

 
Mera
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रात राहून इथल्या मातीशी गद्दारी करीत औरंगजेबाबद्दल प्रेमाचा पुळका आलेल्या मेरा खुर्द येथील काहींनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे स्टेटस ठेवले होते. यामुळे शिवभक्तांकडून तीव्र संतापाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने आज,२१ फेब्रुवारीला चिखली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

     Jjj

  जाहिरात👆

काल, २० फेब्रुवारीला चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे स्टेटस ठेवले होते. ही बाब शिवभक्तांच्या ध्यानात येताच तणावाची स्थिती निर्माण झाली. मेरा खुर्द येथील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मेरा खुर्द येथे पोहचून ४ समाजकंटकांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह बुलडाणा येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली.

सध्या मेरा खुर्द येथे तणावपूर्ण शांतता आहेत. संपूर्ण जिल्हाभरातून या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक केली असली तरी ज्यांनी हे स्टेटस तयार केले, शेअर केल्या अशा सर्वांची तातडीने चौकशी करण्यात येऊन नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मेरा खुर्द येथील "त्या" समाजकंटकामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे आज,२१ फेब्रुवारीला चिखली बंद चे आवाहन करण्यात आले आहे.