BREAKING दुधा घाटात एसटी बस कोसळली! मलकापूर वरून छत्रपती संभाजी नगर कडे जात होती!

 
Bus
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा धाड रस्त्यावरील दुधा घाटात आज शुक्रवारच्या सकाळी एसटी बसचा मोठा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण हुकल्याने बस थेट घाटात कोसळली.
२० ते २५ फुटावर असलेल्या एका झाडात बस अटकल्याने बसमधील सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे. काही प्रवाशी जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजता हा अपघात झाला. या अपघाताचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात बुलडाणा लाइव्ह वर आम्ही प्रकाशित करणार आहोत.