खामगावात घरफोडी!चोरट्यांचा सोन्या - चांदीसह,टीव्हीवरही डल्ला..!

 
Door
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावातील रेखा प्लॉट मध्ये बंद असलेले घर चोरट्यांनी फोडून घरातील देवी - देवतांच्या मुर्त्यासह सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ७४००० रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ११ जून राजी उघडकीस आली.
सौ उर्मिला आनंदसिंग परदेशी (वय - ६० वर्ष रा. रेखा प्लॉट. खामगाव) ह्या १२ मे रोजी घराला कुलूप लावून मुलाकडे पुणे येथे गेले होते. काल, ११ जून रोजी ते दुपारी घरी परत आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरामागील चैनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घराचा लाकडी दरवाजा तोडला घरातील साहित्य अस्थाव्यास्थ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातून एक काळे मनी असलेली दहा वर्षापूर्वी केलेली जुनी वापरती सोन्याची पोत वजन अंदाजे २.५ तोळे कि, अ ४००००/-रु,दोन सोन्याच्या अंगठ्या दहा वर्षापूर्वी केलेल्या जुन्या वापरत्या प्रत्येकी ५ ग्रॅम कि.अ १५०००/-रु, चाँदीचे अंदाजे २० शिक्के प्रतेकी १० ग्रॅम वजणाचे एकुण २०० ग्राम कि, अ ७०००/-रु, दहा वर्षापूर्वी खरेदी केलेला जुना वापरता सोनी कंपनीचा एल.ई.डी टि.वी ७०००/-रु, नगदी रोख रक्कम ५०००/-रु असा एकुण ७४०००/-किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. पुढील तपास पो.हे.काँ निलसींग चव्हाण करीत आहेत.