चोरट्यांचा मध्यरात्री घरावर डल्ला! रोख रक्कमेसह सोने, चांदी, घेवून फरार,जळगाव जामोद तालुक्यातील घटना..!

 
Police station
जळगाव जामोद(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरट्यांनी मध्यरात्री घरावर डल्ला मारून रोख रक्कमे सह सोने, चांदी, घेवून फरार झाल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील घडली आहे.
१७ ऑगस्ट च्या मध्यरात्री ११ वाजताच्या दरम्यान दोन अज्ञातांनी घरातील लोखंडी पेटीतील नगदी ३ लाख रुपये, सोन्याची गहू पोथ २४ ग्राम किंमत ८० हजार रुपये, कर्णफुले ४ ग्राम किंमत १२ हजार, सोन्याची एकदानी पोथ किंमत २४ हजार रुपये असा एकूण ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अशी तक्रार नामदेव गोविंदा गवळी(६०) रा. तिवडी अजानपूर ता - जळगाव जामोद यांनी १८ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला दिली आहे. पुढील तपास पीएसआय दोडके करीत आहेत.