नांदुऱ्यात चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री दोन घरे फोडली! पोलिसांसमोर चॅलेंज....

 
नांदुरा
नांदुरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) नांदुरा शहरात एकाच दिवशी दोन घरफोड्या होवून चोरट्यांनी १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.....
  शहरातील वार्ड क्रं. एक मधिल लक्ष्मी नगर येथील गुणवंत भाऊराव साबे वय (५०) हे दोन ऑगस्टच्या रात्री त्यांचे मोटरसायकलचे गॅरेज बंद करून त्यांच्या राहत्या घरी झोपले असता अज्ञात चोरट्यांने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले नगदी ६० हजार रुपये, एक दोन ग्रॅमची अंगठी कींमत ६ हजार व ४ ग्रॅमचे कानातील टॉप्स कींमत ८ हजार रुपये असे चोरुन नेले. तर साबे यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या उमेश हरिश्चंद्र पाटील यांच्या घरातील देखील चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नगदी ३ हजार रुपये असा एकूण एक लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गुणवंत साबे यांच्या फिर्यादिवरून नांदुरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३३१(४),३०५ (अ) ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.