मोताळा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; ८५ हजार किमतीचे शेतीसाहित्य केले लंपास ! ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत..

 
मोताळा (अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मोताळा तालुक्यात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे शेती साहित्य लंपास होत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 
  तालुक्यातील दाभाडी शिवारातून ८५ हजार किमतीचे ठिबक सिंचन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३ जून रोजी उघडकीस आली. मलकापूर येथील शेतकरी भूषण दिनकर कासार यांनी बोराखेडी पोलीसांत तक्रार दिली की, दाभाडी शिवारातील त्यांचे शेतातून ठिबक सिंचनाचे २७ बंडल अज्ञात चोरट्याने चोरी केले. हे ठिबक सिंचन ८५ हजार किमतीचे होते. तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास गायकवाड, श्रीकांत चिटवाल करत आहेत.