शेगावात चोऱ्या वाढल्या; घराचे कुलूप तोडून एका लाखाचा मुद्देमाल लंपास!

 
शेगाव

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून शेगावात चोरींचा घटना वाढीस लागल्या आहेत. येथील सुर्या नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल एका लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. 

   घटना, १५ मे रोजी रात्री २ ते सकाळी ९ वाजेदरम्यान घडली आहे. याबाबत जुलकर जैन अब्दुल सत्तार (५१ वर्ष) रा. सूर्या नगर, शेगाव यांनी शेगाव पोलिसांत तक्रार दिली की, निजामाबाद येथे गेलो असता घरात हज येथे जाण्यासाठी जमा केलेले पैसे व लोखंडी कपाटात ठेवलेले रोख ७० हजार, सोन्याची अंगठी किंमत १८ हजार, पोत किंमत ८ हजार, चांदीची चैन पठ्ठी, ३९ हजारांचे दागिने असा एकुण १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून , घरात प्रवेश करून चोरून नेला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.