सैलानी बाबांच्या दर्गा परिसरात मोबाईल चोरणारा चोरटा बुलडाण्याचा ! रायपूर पोलिसांनी बारा तासाच्या आत आवळल्या मुसक्या!

 
police
रायपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १२ डिसेंबर रोजी सैलानीबाबा दर्गा परीसरात मोबाईल चोरणारा रायपुर पोलीसांच्या ताब्यात आल्याची बातमी आहे. आरोपी बुलडाणा शहरातील इक्बाल चौकातील रहिवासी असुन त्याचे नावं सोहील सय्यद इस्माईल (२०वर्ष)असे आहे.
 

मंगळवारी रायपूर येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी सादुल्ला हुसेन मोहम्मद ताहेर अली आंध्रप्रदेश  येथुन आले होते. दर्शन घेत असताना  गर्दीचा फायदा घेत आरोपी सोहिलने  त्यांच्या खिशातून ॲपल कंपनीचा (किमंत१ लाख रु.) चोरी केला. 
हुसेन मोहम्मद ताहेर अली यांनी मोबाईल घेण्यासाठी जेव्हा खिशात हात टाकला तेव्हा त्यांना मोबाइल चोरी गेल्याचे कळले. त्यांनतर त्यांनी रायपूर पोलिस ठाण्यात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दिली. त्यावरून आरोपीवर कलम ३७९ भा. द. वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


आरोपी अज्ञात असल्याने  ठाणेदार दुर्गेश राजपुत पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले त्यानंतर गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी बुलढाणा शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. डीबी पथकाच्या साह्याने  रायपूर पोलिसांनी  बुलढाणा शहरात येऊन आरोपी सोहेल सय्यद इस्माईल ताब्यात घेतले.  चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सदर आरोपीकडून चोरी केलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी १२ तासाचे आंत हि कारवाई केली आहे.  कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार,पोलीस अंमलदार गजानन जाधव, युवराज शिंदे, विनोद बोरे, शिवहरी सांगडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच आरोपीकडून जिल्ह्यातील मोबाईल चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सांगितले आहे.