बुलडाण्यात दादागिरी वाढली! बातमी वाचल्यावर तुम्हालाही पटल...घटनाच तशी घडली...

 
जळजळ
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात दादागिरी वाढली आहे. कुणी भररस्त्यात माणसांना अडवतं, तर कुणी दिवसाढवळ्या चोरी करून पसार होतं गत तीन वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. २० जानेवारीच्या रात्री दोघांनी एकाला अडवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. प्रकरणी ईश्वर वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशुतोष पडघान ,उदय गवळी, (रा मिलिंदनगर बुलडाणा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
  ईश्वर वाघमारे चिखलीतील सावरगाव डुकरे येथील मूळ रहिवासी आहेत, ते पोलीस भरतीची तयारी करतात. बुलडाण्यात खोली करून राहतात, शनिवार रात्री जेवण करण्यासाठी खोलीवरून ते निघाले. तितक्यात बस स्थानकाजवळ रात्री ८ वाजता आशुतोष पडघान आणि उदय गवळी यांनी त्यांना अडवले. "तुझ्याजवळ जेवढे पैसे असतील तेवढे दे नाहीतर मारून टाकू" अशी धमकी त्यांनी ईश्वराला दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. माझ्याकडे पैसे नाही असे सांगितल्यावर त्यांनी ईश्वरची अंग झडती घेतली त्यातून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मग ईश्वरने आरडओरड केली. लोक जमा झाले, वेळीच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, आणि तिघांना ठाण्यात नेले. ईश्वरने सगळी हकीगत सांगितली त्यानुसार आशुतोष पडघान,(२४ वर्ष) उदय गवळी (३५ वर्ष) या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील किनगे करत आहेत.