बुलडाणा हादरलं! मिरवणुकीत नाचताना, चाकू खुपसून तरुणाचा खून !

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरच न्हवे तर संपूर्ण जिल्हा हादरून टाकणारी घटना काल रविवारी रात्री घडली. भीमजयंतीत नाचत असताना एका तरुणाच्या छातीत चाकू खुपसून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशुतोष संजय पडघान (२२ वर्ष) असे मृतक तरुणाचे नाव आहे. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास जयस्थंभ चौक परिसरा जवळील गुरुनानक ड्रेसेस समोरील एका बोळीत अज्ञात व्यक्तीने आशुतोषचा खून केला. बुलढाणा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अतिशय वेगाने तपासचक्रे फिरत आहेत.
या घटनेनंतर रात्री उशिरा आशुतोषचा मामेभाऊ कुणाल निकाळजे यानी बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मृतक आशुतोष पढघान हा गोडेकॉलेज परिसरात राहत होता.
काल भिमजयंती निम्मित शहरात भव्य मिरवणूक निघाली होती. यादरम्यान मिरवणुकीत नाचत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला चाकू खुपसला. त्यांनतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या छातीवर टोकदार चाकूने वार केल्याचे समजते आहे. असे तक्रारीत म्हटले आहे.