बुलढाणा 'एलसीबी'ची दमदार कामगिरी! शस्त्रधारी दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद! नांदूरा, जलंब हद्दित पडला होता दरोडा!६ दिवसांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या ​​​​​​​

 
public

बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचा दूरदृष्टीपणा, निस्वार्थ बाणा व नियोजनबध्द नेतृत्वात बुलढाणा गुन्हे शाखेची सुसाट कामगिरी सुरु आहे. किचकट व गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचा जणूकाही त्यांनी सपाटाच लावला आहे. दरम्यान, २९ जुलैच्या रात्री या विभागाने नांदुरा शहर पोलीस स्टेशन हद्दितील १२ जुन व जलंब पोलीस स्टेशन हद्दितील २४ जुलैचा दरोडा व जबरीचा गुन्हा उघडकीस आणला. नव्हे तर दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. नांदुरा शहरातील संचेती ले आऊट परिसरात राहणारे विजय संतुमल मोहनानी हे १२ जुनच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्कुटीने घराकडे जात असतांना विकास वैष्णव यांच्या घराजवळ तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अनोळखी इसमांनी मोहनानी यांच्या स्कुटीला धक्का देऊन त्यांना खाली पाडले. कपाळावर दगड मारुन त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील २ लाख १४ हजार ८०० रुपये असलेली बॅग हिसकावून पळून गेले होते. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत भादंविचे कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २४ जुलै रोजी रात्री ८.१५ वाजता सोहम सुरेश जामोदे (रा. अंभोडा ता. नांदुरा) हे त्यांच्या वडीलांसमवेत मोटारसायकलने नांदूरा येथून आंभोडा गावाकडे जात होते. आमसरी शिवारात अज्ञात ४ जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना खाली पाडले.त्यांच्या वडीलांना मारहाण करुन सोहम जामोद यांना चाकू मारुन जखमी केले व त्यांच्या जवळील ९५ हजार रुपये रोख, १३ हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप, असा एकून १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून चोरुन नेला होता. या प्रकरणी जलंब पोलिसांत भादंविचे कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होवून चांगलीच खळबळ उडाली होती.

उपरोक्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सपोनि विलासकुमार सानप, निलेश सोळंके, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, राजेंद्र टेकाळे, जगदेव टेकाळे, गजानन गोरले, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, संजय भुजबळ, अजिस परसुवाले तसेच जलबं पोलीस स्टेशनचे सपोनि अमोल बारापात्रे, पोलीस अंमलदार धर्मेंद्र निंबाळकर, रविंद्र गायकवाड, संदिप गावंडे, अमोल कवळे, प्रविण पडोळ, कैलास टोंबरे यांनी गोपनीय माहिती काढली. उपरोक्त गुन्ह्यांत नांदुरा परिसरातील इसमांचा सहभाग असल्याचे समजले. पथकांनी अत्यंत शिघ्रपणे तपास कारवाई करुन आरोपी शेख साजीद शेख ईमाम कुरेशी (वय २१) रा. नांदूरा, इकबाल खान आसिफ खान (वय २६) रा. नांदुरा, वसीम शहा छोटु शहा (वय २०) रा. मोताळा व मंगेश बारसु सोनोने (वय २३) रा. मोताळा यांना ताब्यात घेतले. त्यांची कसुन विचारपूस केली असता, त्यांनी उपरोक्त गुन्ह्यांची कबुली दिली. यावेळी त्यांच्या ताब्यातून २ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असुन उर्वरीत मुद्देमाल व एका फारार असलेल्या आरोपी शोध सुरु आहे. उपरोक्त आरोपींच्या संबंधीत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या धडाकेबाज कारवयांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.टोळी जेरबंद

दरोडेखोरांना पोलीस कोठडी

दरम्यान, उपरोक्त आरोपींना शेगाव येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विद्यमान न्यायालयाने त्यांना २ ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे अधीक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यात वर्तविण्यात ये आहे.