बुलढाणा शहरातील घटना ; पती व दिराने केली मारहाण ! कारण काय तर...
Apr 10, 2024, 18:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शुल्लक कारणावरून विवाहितेला तिच्या पतीने व दिराने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी येथील मिलींदनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Advt. 👆
नंदा अंभोरे असे पीडित महिलेचे नाव आहे. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती तुळशीराम मोरे आणि दिर समाधान मोरे याच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुक्रवारी , ५ एप्रिलला पती तुळशीराम मोरे याने चेक बुक कुठे ठेवले असे विचारले असता घरात चेकबुक तुम्हीच ठेवले आहे, तुम्हाला माहिती असेल असे पिडीतेने सांगितले. मात्र तुळशीराम याने शिवीगाळ केली आणि चापटा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनतर त्याने भाऊ समाधान अंभोरे याला बोलावून घेतले. त्याने देखील शिवीगाळ केली. एवढेच काय तर पिडीता नंदा अंभोरे यांना दगड मारून जखमी केले. असे तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.