बुलडाण्यात पोलिसांचे ढिशक्यांव...ढिशक्यांव! १०८८ कर्मचारी आणि ११२ अधिकाऱ्यांनी नेम धरून केली गुन्हेगारांचा "गेम" करण्याची प्रॅक्टिस..

 
police
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वार्षिक गोळीबार सरावाचे आयोजन केले होते. १६ ते २१ मार्च दरम्यान बुलडाण्यातील चांदमारी परिसरातील  गोळीबार मैदानावर हा सराव पडला.  ११२ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील १ हजार ८८ कर्मचारी या सरावात सहभागी झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारीही या सरावात नेम धरतांना दिसले. 
 

जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्र हाताळण्याचा सराव व्हावा, अभ्यासाची उजळणी व्हावी म्हणून हा सराव आयोजित करण्यात येत असतो. गोळीबार मैदानावर सकाळी ७ ते १० या वेळात नुसता फायरिंगचा 
 ढिशक्यांव ढिशक्यांव असा आवाज घुमत होता. प्रत्येक दिवशी १५० ते २०० अधिकारी, कर्मचारी या सरावात भाग घेत होते. पिस्टल, रिवाल्वर, कारबाईन, टेलबोर, एसएलआर, इन्सास आणि एके ४७ या अत्याधुनिक बंदुकीचा वापर या सरावात करण्यात आला. लक्ष साधण्यासाठी एकेका अधिकाऱ्याला प्रत्येक शस्त्राचे १० राऊंड देण्यात येत होते. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच पुस्तकाद्वारे देखील या अभ्यासाची उजळणी होणार आहे. पोलिस मुख्यायात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या पुस्तकातून