मजुबत बांधा,रंग गोरा ! ४ महिन्याने होणार होती १८ वर्षांची; कुणीतरी अपहरण केले! शेगावची घटना; आईचा पोलीस ठाण्यात टाहो..

 
police station shegaon
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात बेपत्ता होण्यासह अपहरणाच्या घटना देखील वाढत आहेत. शेगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अल्पवयीन मुलीचे आई - वडील दोघेही मजुरी करतात. आई मजुरीला गेलेले असताना हा प्रकार घडलाय. मुलीच्या वडिलांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असल्याने त्यांना फारसे नीट दिसत नाही.
 

शेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. शेगाव शहरातील मिलिंद नगर भागात मुलगी तिच्या आई वडील भावासह राहत होती.  मुलीने यंदा १२ वी परीक्षा पास केली आहे. तिचे वय सध्या १७ वर्षे ८ महिने एवढे असल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या दिवशी मुलीची आई मजुरी कामाला गेलेली होती तर  तिचे वडील घरीच होते. संध्याकाळी  साडेसातला मुलीची आई घरी आली तेव्हा मुलगी दिसली नाही. मुलीच्या वडिलांनी दुपारी ४ पासून ती मैत्रिणीच्या घरी गेल्याचे सांगितले. संबधित मैत्रिणीच्या घरी जाऊन विचारणा केली असता ती इकडे आलीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली.  गोऱ्या रंगाची, मजबूत बांध्याची, ५ फूट उंचीची, अंगात निळ्या रंगाचा ड्रेस, काळे केस,लांब चेहरा अशा वर्णनाच्या मुलीचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे तिला पळून नेले असावे असे तिच्या आईचे म्हणणे आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.