इस्टेटीसाठी सख्या भावांचा वाद!तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू ! दोन गंभीर; साखरखेर्डा येथील घटना

 
साखरखेर्डा
साखरखेर्डा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर रोडवरील महालक्ष्मी तलाव जवळील ई-क्लासच्या जागेवरुन चौघा भावंडात १९ एप्रिल रोजी लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तिघांमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - झाला. एकनाथ सिताराम टाले (वय ३० वर्ष), असे मृतकाचे नाव आहे.
साखरखेर्डा येथील सिताराम - टाले यांना सात मुले आहेत. ३५ - वर्षांपूर्वी पित्याचे छत्र हरपले. आईने रामदास, भानुदास, देविदास, - हरिभाऊ, पांडुरंग, अंबादास, एकनाथ यांचा मोलमजुरी करून - संभाळ केला. रामदास, भानुदास, अंबादास, देविदास हे मोलमजुरी करून शेती व्यवसायाकडे वळले तर लहान भावंडांनी महालक्ष्मी तलावाच्या काठावर ई-क्लास जमिनीवर टुमदार धाबा सुरु केला. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून लहान वयात अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात जम बसवला. २५ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या व्यवसायाला देविदास यांची नजर लागल्याने सदर जागा मलाच हवी, अशी मागणी करुन त्याने तीन्ही लहान भावंडांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी बाजूची जागा देतो, तुम्ही भांडण करु नका म्हणून गयावया केली. मात्र, त्याने त्याच जागेचा हट्ट धरून त्याच्या दोन मुलाना सोबत घेऊन १९ एप्रिल रोजी तिघाभावंडांवर लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला केला
होता. घेऊन १९ एप्रिल रोजी सकाळी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरिभाऊ, पांडुरंग व एकनाथ यांना चिखली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोमात असलेल्या या तीघा भावंडापैकी आज ८ मेच्या सकाळी एकनाथचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पांडुरंग टाले यांच्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात भादंविचे कलम ३०२ सामाविष्ट करण्यात आले आहे. मुख्य आरोपी देविदास टाले, पवन टाले व श्रीकृष्ण टाले यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनात साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.