बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या भावाला बेदम मारहाण! ९ जणांविरोधात गुन्हा, धाडची घटना..
Jun 8, 2024, 18:59 IST
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या भावाला बेदम मारहाण केली ही घटना धाड येथील अंजुमन चौकात ६ जून रोजी घडली. प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रायपूर येथील मो. रीहान. मो. कलीम हे ६ जून रोजी बहिणीला सोडण्यासाठी धाड येथे आले होते. दरम्यान, अंजुमन चौकात काही लोकांनी गैरकायदायची मंडळी जमवून लोखंडी रॉडने, फायटरने बेदम मारहाण करून त्यांनी फिर्यादीस जखमी केली. तसेच शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकीही दिली. इतकेच नाही तर सोबत असलेल्या बहिणीला देखील मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोमीना परवीन शेख जमाल, समीना परवीन अब्दुल रहेमान, फिरोजाबी शेख जमाल, सानिया परवीन अब्दुल रहेमान, शिरीन परविन शे.रिजवान, शेख उस्मान शेख जमाल,शेख रिजवान शेख जमाल, शेख इरफान शेख जमाल व शेख जमाल असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल सोनुने, करीत आहे.