BREKING भीषण अपघात! एसटी बस आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक! दोन्ही चालक गंभीर; बसमध्ये २० शाळकरी विद्यार्थ्यांसह होते ४७ प्रवाशी! लाखनवाडा उदयनगर रस्त्यावर झाला अपघात...

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान पिंप्री कोरडे नजिक आज,५ डिसेंबरच्या सकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाक. यात दोन्ही चालक गंभीर जखमी असून बस मधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगर कडे जात होती. बस मध्ये एकूण ४७ प्रवाशी होते, त्यामध्ये २० पासधारी शाळकरी विद्यार्थी होते. पिंपरी कोरडे गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली गेली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या चालकाला अधिक मार लागला असून काही किरकोळ जखमी आहेत. बसचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.