Amazon Ad

BREKING शाब्बास अंढेरा पोलीस..! सगळ काही आव्हानात्मक होत तरीही २४ तासांच्या आत चंदनपुरच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद; वसईतून रेल्वेतून उचलले....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील  चंदनपुरात एका परप्रांतीय तरुणीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला होता. ज्या तरुणीचा खून झाला ती कोण, कुठली हे माहिती नाही? तिचे नेमके नाव माहिती नाही, घटनास्थळी तिचे ओळखपत्र म्हणून काही पुरावा नाही, ज्या तरुणांनी खून केला त्यांच्याबद्दल देखील काहीच माहिती नाही,केवळ ते पश्चिम बंगालचे असल्याचे त्यांनी आधी ज्याच्याकडे कामाला आले त्या मालकाला सांगितलेले...या प्रकरणाचा तपास करण खरचं चॅलेंजिग होत..पण अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले आणि लिलया पेलले देखील...२४ तासांच्या आत याप्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वसई रेल्वे स्थानकावरून रेल्वेतून आरोपींना जेरबंद करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपींना घेऊन पोलिसांचे पथक अंढेऱ्याकडे रवाना झाले आहे.

पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगणारे दोन तरुण आणि एक तरूणी चंदनपुर येथे थ्रेशर मशीनवर कामासाठी आले होते. अनंता इंगळे यांच्या थ्रेशर मशीन वर ते काम करणार होते. १३ ऑक्टोबरला ते आले तेव्हा त्यांच्याकडे कपडे नव्हते, म्हणून थ्रेशर मालक त्यांना मेरा बु येथील दुकानात घेऊन आले व त्यांना कपडे खरेदी करून दिले. राहण्यासाठी एक घर उपलब्ध करून दिले. १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री थ्रेशर मालक इंगळे यांना ते घर उघडे दिसले, घरात पाहिले असता तरुणीचा मृतदेहच दिसला. दोन्ही तरुण गायब झालेले दिसले. त्यानंतर तात्काळ अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

 दुकानातील सीसीटिव्ही फुटेजची तपासाला मदत..
 

दरम्यान खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर ठाणेदार विकास पाटील यांना मेरा बु येथील कापड दुकानातून आरोपींनी कपडे खरेदी करण्याविषयी कळले. त्यांनी तात्काळ  थ्रेशर मालक इंगळे यांना सोबत घेऊन  मेरा बु तेथील त्या दुकानांतील सीसीटिव्ही फुटेज तपासले. दुकानांतील  सीसीटिव्ही फुटेज मध्ये तरुण कपडे खरेदी करीत असल्याचे कैद झाले होते..या फुटेजची पोलिसांना तपासात मोठी मदत झाली. कालच आरोपींच्या शोधासाठी अंढेरा पोलिसांचे पथक रवाना झाले होते, आज १५ ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास दोन्ही आरोपींना पोलिसांनी वसई येथून रेल्वेतून ताब्यात घेतले आहे. तरुणांनी तरुणीचा खून का केला? तरुण तरुणीचे नाते काय होते? यासंबंधीच्या अनेक प्रश्नांची उकल आता आरोपी तरुणांच्या चौकशीतून होणार आहे..तूर्तास २४ तासांच्या आत आरोपींना जेरबंद करणाऱ्या अंढेरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय...