BREKING! बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गणेशच्या नातेवाईकांचा ठिय्या;

आईचा आक्रोश.."माझ्या लेकराला जिवंत करून द्या"! ट्रकमालकाला ताब्यात घेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका; पोलीस ठाण्यात ट्रक फोडण्याचा प्रयत्न...
 
Bfjfn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील इक्बाल चौकात काल, १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी आयशर ट्रकच्या चाकाखाली येऊन १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असले तरी तेवढ्यावर मृतक बालकांच्या नातेवाईकांचे समाधान झाले नाही.जोपर्यंत ट्रक मालकाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे..
मृतक गणेशचे आई वडील व शंभरावर नातेवाईक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आहे. मृतक गणेशची आई माझ्या लेकराला जिवंत करून द्या म्हणत हंबरडा फोडत आहे. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत असलेल्या पोलीस स्टेशनच्या आवारात उभा असलेला ट्रक फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र काही समजूतदार नातेवाईकांनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला..