BREAKING धक्कादायक ! खामगावात अज्ञाताकडून धारधार शस्त्राने पानटपरी चालकाचा खून!बस स्टँड समोरील घटना

 
Hshhd
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगावात धारधार शस्त्राने वार करून पानटपरीचालकाचा खून केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. प्रकाश सोनी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची खामगाव बसस्थानकासमोरच पानटपरी आहे.
प्राप्त माहितीनुसार अतिशय वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. प्रकाश सोनी हे त्यांच्या पानटपरीवर असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सपासप सोनी यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाला. हल्लेखोर कोण होता? त्याने खून का केला या बाबी अद्याप समोर यायच्या आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, खामगाव शहर पोलीस निरीक्षक नाचनकर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला होता. सध्या पोलीस घटनेचा उलगडा करण्यात व्यस्त आहेत.परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासणे सुरू आहे.