BREAKING खळबळजनक ! घाटाखालचे दोन एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला..! तयारीला लागले अन्... वाचा नेमक झालं काय?

 
मलकापूर (स्वप्निल आकोटकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) घाटाखालील दोन राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. आज पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दाताळा येथे सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर तेथून पसार झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मोताळा तालुक्यातील शेलापुर गाठले. तिथेही दोघांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.
असा फसला चोरीचा प्रयत्न! 
  मारुती कंपनीच्या चार चाकी वाहनाने अज्ञात चोरटे एटीएम समोर आले. एटीएम गृहात त्यांनी प्रवेश केला. चेहरा झाकून आल्याने ते स्पष्ट दिसू शकले नाही. दरम्यान, दाताळा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असता शेजारील काही नागरिकांचा आवाज ऐकून चोरट्यांनी फळ काढला. त्यांनतर चोरटे शेलापूरच्या दिशेने निघाले. तिथेही असा काहीसा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी 'बुलडाणा लाइव्हला' बोलताना सांगितले. दरम्यान दोन्ही ठिकाणच्या घटना एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले.
News Hub