BREAKING माजी आमदार विजयराज शिंदेच्या गाडीला अपघात! विजयराज शिंदेंसह ९ जखमी! अकोला जिल्ह्यात झाला अपघात

 
kfoof

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे .अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे अपघात झालाय या अपघातात विजयराज शिंदे यांच्यासह ९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

विजयराज शिंदे अकोल्यावरून अमरावती कडे जात होते. त्यावेळी कारंजा वरून अकोल्याकडे येणाऱ्या एसटी बस ने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात विजयराज शिंदे यांच्यासह ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या अपघाताचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात बुलडाणा लाइव्ह वर प्रकाशित करण्यात येईल.