BREKING चंदनपुर हत्याकांड प्रकरणी महत्वाचे नवे अपडेट! आरोपींची संख्या झाली ५ ; कोण आहे पाचवा? कुठून आणला...बातमीत वाचा...
Oct 28, 2023, 17:07 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील चंदनपुर हत्याकांड प्रकरणाला जसजसा तपास पुढे सरकत आहे तसे नवीन वळण येत आहे. १३ ऑक्टोबरच्या रात्री पश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तिची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना अटक केली होती. सोयाबीन काढणीसाठी मशीनवर कामासाठी चंदनपुरात आलेल्या तिच्या सोबतच्या दोन तरुणांनी तिची हत्या केल्याचे समोर आले होते. मात्र आधी केवळ हत्या प्रकरणापुरते मर्यादित असलेले हे प्रकरण नंतर गुंतागुंतीचे बनत गेले. आधी २ आरोपी असलेल्या या प्रकरणात आता आरोपींची संख्या ५ झाली आहे..
अटक करण्यात आलेले सर्वच आरोपी पश्चिम बंगालचे आहेत. राहुल आणि छोटू अशी नावे सांगून चंदनपुरात प्रवेश मिळवलेल्या आरोपींची खरी नावे वेगळीच असल्याचे समोर आले होते. जाकीर उल दायी आणि अलीमोद्दीन मिया या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली खरी मात्र पुढच्या तपासात जाकीरचे आधारकार्ड बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस कोठडीदरम्यान अंढेरा पोलिसांची टीम आरोपींना घेऊन पुण्याला गेली. हा पुणे दौरा "फायद्याचा" ठरला. पुण्यातून पुन्हा दोन आरोपींना अटक करून अंढेऱ्यात आणले. बनावट आधारकार्ड बनवण्यात या आरोपींचा हातखंडा आहे. गुलाम शेख आईनउल हक (३२, ग्वाईजवाडी, जि मालंदा, पश्चिम बंगाल, हमु कोरेगाव पार्क, वेस्टर्न हॉटेल पुणे) आणि मोहम्मद अख्तर आलम अब्दुल कुट्टुरा (४०, रा.ग्वाईजवाडी, जि मालंदा, पश्चिम बंगाल) ही पुण्यातून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी तपास अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालला रवाना करीत आणखी खोलात जाऊन तपास करण्याच्या सूचना केल्या. अंढेरा पोलिसांनी आणखी एक आरोपी पश्चिम बंगालवरून उचलून आणला आहे, त्याचे नाव अद्याप कळू शकले नाही मात्र तो देखील बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा घटक असल्याचे समजते. साध्या कलर प्रिंटर च्या माध्यमातून तो हे काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान पाचही आरोपी भारत बांगलादेश सीमाप्रदेशाला लागून असलेल्या क्षेत्रातील आहेत, त्यामुळे यामुळे याप्रकणात बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रकरणाशी काही संबधित आहे का? बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीने आतापर्यंत किती जणांना असे बनावट आधार कार्ड बनवून दिले या बाबी तपासण्याची गरज आहे..