BREAKING बुलडाणा लाइव्ह ने उघडकीस आणलेल्या प्रकरणात सत्याचा विजय ! वस्तीगृहातील मुलींना अळ्या असलेले अन्न खायला घालणाऱ्या वॉर्डन स्मिता जोशी विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल;

वस्तीगृहातील मुलींनी मानले "बुलडाणा लाइव्ह" चे आभार..
 
Ygg
चिखली(गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलींना अळ्या असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्याने ६ मुलींना विषबाधा झाली होती. प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याएवजी वस्तीगृह प्रशासनाने खाजगी रुग्णालयात दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निर्भिड पत्रकारितेचा वसा घेतलेल्या बुलडाणा लाइव्ह ने प्रकरण उजेडात आणताच सगळीकडे संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी बुलडाणा लाइव्ह च्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून वस्तीगृहाच्या वॉर्डन विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विषबाधा झालेल्या ६ मुलींपैकी एक असलेल्या कु सीमा प्रकाश चव्हाण (२३, रा.सावखेड नागरे) या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वस्तीगृहाची वॉर्डन स्मिता जोशी हिनेच मुलींना अळ्या व उंदराच्या लेंड्या असलेले अन्न खायला दिले. मुलींनी जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा जातीवाचक शिवीगाळ करून "तुझा वस्तीगृहातील प्रवेश रद्द करीन" अशी धमकी देखील स्मिता जोशीने मुलींना दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी स्मिता जोशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे प्रकरण सर्वप्रथम उजेडात आणणाऱ्या बुलडाणा लाइव्ह चे पीडित मुलींनी आभार मानले आहेत.