BREAKING संतापजनक! तरुणीला जाळून मारले; बलात्कार करून खुनाचा संशय! चिखली - देऊळगावराजा रस्त्यावरील असोला शिवारात आज सकाळी आढळला मृतदेह...
Jan 23, 2024, 10:46 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक बातमी समोर आली आहे. अंदाजे १९ ते २३ वर्षे वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. चिखली देऊळगावराजा रोडवरील असोला शिवारात आज ,२३ जानेवारीच्या सकाळी हा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार चिखली ते अंचरवाडी दरम्यान असोला शिवारात असलेल्या हॉटेल राजवाडा च्या मागे हा मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी तरुणीला करून जाळल्याचे दिसते. त्यामुळे अज्ञात आरोपीने बलात्कार करून तिला संपवले असावा असा अंदाज आहे. मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे, त्यामुळे तरुणी नेमकी कोण हे अद्याप समजले नाही. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे...