बुलडाण्याच्‍या जुना गावात आढळला मृतदेह!

 
deathbody
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील जुना गाव परिसरातील हनुमान मंदिरासमोरील शिवरत्न शिवा काशिद उद्यानात आज, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी वृध्दाचा मृतदेह आढळला.
प्रल्हाद छोटूलाल विटावा (६०, रा. तेलगूनगर, बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी नागरिक मंदिराकडे आले असता त्यांना मृतदेह दिसला. हा व्यक्ती व्यसनी असल्यामुळे नेहमी घरून निघून जायचा. तसाच तो कालही घरून निघून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.