BIG UPDATE डोक्यात हातोडा टाकून चिमुकल्या क्रिष्णाला संपवले! मर्डरचे "हे" धक्कादायक कारण समोर! दोन मारेकरी गजाआड; कसा रचला होता प्लॅन? सविस्तर वाचा...
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील नागझरी येथील क्रिष्णा राजेश्वर कऱ्हाळे यांच्या खुनाच्या बातमीने जिल्हाभर एकच हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांत अशा दोन घटना घडल्या आहेत. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अरहानचा खून झाल्याची घटना २३ जुलैला उघडकीस आली होती. दरम्यान नागझरी येथील १४ वर्षीय क्रिष्णाचे २३ जुलै रोजी अपहरण झाले होते, ट्युशन क्लास आणि शाळेत गेलेला क्रिष्णा घरी परतला नसल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.. आज २५ जुलैला त्याचा मृतदेहच भास्तन येथील जंगलात आढळला ,त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणात आता मोठे अपडेट समोर आले आहे.
कृष्णाचा डोक्यात हातोडा टाकून मारेकऱ्यांनी त्याचा खून केला, त्यानंतर त्याचा मृतदेह पोतडीत टाकून पुर्णा नदीच्या काठावरील भास्तन जंगलात टाकून दिला. याप्रकणात दोन आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहेत. रुपेश वारोकार (२२, रा. नागझरी ता.शेगाव) आणि पृथ्वीराज मोरे (२१) अशी आरोपींची नावे आहेत.