मोठी बातमी! माजी आमदार शशिकांत खेडेकरांच्या वाहनांवर रेती माफियांचा हल्ला; मेहकर फाट्यावर लोखंडी रॉडने केला हल्ला;

शशिकांत खेडेकरांचे चिरंजीव श्रीनिवास खेडेकर थोडक्यात वाचले; चिखली पोलीस ठाण्यात तक्रार; शशिकांत खेडेकर म्हणाले , भीत नाही....

 
Bdhdb
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाहनावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना उजेडात आली आहे. १० जूनच्या रात्री साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेची आज,१३ जूनला चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मेहकर फाटा परिसरात ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शशिकांत खेडेकर यांचे चिरंजीव श्रीनिवास खेडेकर यावेळी वाहनात होते.
देऊळगाव राजा येथील लग्न समारंभ आटोपून श्रीनिवास खेडेकर बुलडाण्याकडे जात होते. त्यावेळी मेहकर फाटा परिसरात अज्ञात रेतोमाफियाने लोखंडी रॉडने वाहनावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचे स्कॉर्पिओ वाहनाचे ( क्रमांक एम एच २८, सी ४६९९) समोरील काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यातून श्रीनिवास खेडेकर आणि त्यांच्या मातोश्री व चालक थोडक्यात बचावले आहेत. 
   रेती माफियांचा हल्ला?
यापूर्वी देखील शशिकांत खेडेकर यांच्या वाहनाला रेती माफियांना कट मारला होता. त्यामुळे यावेळी देखील रेतीमाफियांनीच हल्ला चढवला असल्याचा संशय शशिकांत खेडेकरांना आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून अवैध रेती बंद केल्यामुळे ते आपल्या जीवावर उठल्याचे शशिकांत खेडेकरांना वाटते.दरम्यान अशा भ्याड हल्यांना आम्ही याआधी भिलो नाही आजही भित नाही आणि उद्याही भिणार नाही. मात्र समोरासमोर येऊन लढा अशी प्रतिक्रिया शशिकांत खेडेकर यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना दिली.