BIG BREAKING भीषण अपघात! लग्नाला जाणारी स्कॉर्पिओ उलटली; अंबाशी येथील चौघेजण ठार! देऊळगावराजाजवळ झाला अपघात
Updated: Apr 17, 2024, 21:52 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी जवळ आज १७ एप्रिलच्या संध्याकाळी भीषण अपघात झाला. लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची स्कॉर्पिओ वाहन उलटल्याने झालेल्या अपघात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेले चौघेही चिखली तालुक्यातील अंबाशी येथील आहेत.
प्राप्त माहितीनुसार चिखली तालुक्यातील आंबाशी येथील ८ जण स्कॉर्पिओ वाहनाने जालना येथे जात होते.यावेळी दगडवाडी येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात वसंत देशमुख(४५) अशोक भीमराव नायक(६५), विलास जयवंत देशमुख (६३) हे जागीच ठार झाले तर योगेश लक्ष्मण देशमुख या चालकाचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. गोपाल आबाराव देशमुख(४३), शालीनी देशमुख(३४), मिरा संजय देशमुख(४०), अक्षरा संदीप देशमुख(१९) यांच्यावर देऊळगावराजात उपचार सुरू आहेत.