BIG BREKING मेरा खुर्द प्रकरणी तणाव! छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा आरोपी अक्रम अजूनही फरार! समाजकंटकाच्या अटकेसाठी हिंदुराष्ट्र सेनेचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या;

पोलिसांनी हिंदुराष्ट्र सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह पाच जणांना घेतले ताब्यात

 
Ghjj
अंढेरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २० फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मेरा खुर्द येथील ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या ६ ते ७ दिवसांपासून मेरा खुर्द गावात संचारबंदी सदृश्य परिस्थिती असताना काल,२६ फेब्रुवारीला पुन्हा एकदा अक्रम नावाच्या एका विकृत समाजकंटकाने इंस्टाग्रामवर  छत्रपती शहाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी फरार असल्याने हिंदुराष्ट्र सेना आक्रमक झाली आहे.

   आरोपीच्या अटकेसाठी हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी कार्यकर्त्यांसह अंढेरा पोलीस ठाण्यासमोर आज दुपारी २ च्या सुमारास ठिय्या मांडला. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या मोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून सध्या स्थानबद्ध केले आहे. मेरा खुर्द गावात सध्या तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध पथके रवाना केली आहेत.