BIG BREAKING खळबळजनक! चंदनपुरात तरुणीचा गळा आवळून खुन ! दोघा तरुणांनी केला कार्यक्रम? एक सांगायचा ही माझी बहिण, दुसरा म्हणायचा माझी बायको; संशयित तरुण पसार...

 
murder

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील चंदनपुर येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचा खून करण्यात आलेला आहे, तरुणीचे वय अंदाजे १८ ते २० दरम्यान असावे असा अंदाज आहे. आज,१४ ऑक्टोबरला ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

प्राप्त माहितीनुसार सोयाबीन काढण्यासाठी थ्रेशर मशीनवर काम करण्यासाठी दोन तरुण आणि एक तरूणी ११ ऑक्टोबरला चंदनपुर येथे ओळखीच्या माध्यमातून आले होते. गावातीलच अनंता तुकाराम इंगळे यांच्या थ्रेशर मशीनवर ते काम करणार होते. त्या तिघांनी ते पश्चिम बंगालचे असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांच्या नावाबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

तिघेही अनंता तुकाराम इंगळे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका घरात राहत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तरुणांपैकी एक तरुण ती आपली बहीण असल्याचे तर दुसरा आपली पत्नी असल्याचे सांगत होता. काल, रात्री तिघांनी सोबत जेवण केले. दरम्यान मध्यरात्री २ च्या सुमारास अनंता तुकाराम इंगळे हे शेतातून तुरीला पाणी देऊन आले, त्यावेळी त्यांच्या मुलाला "त्या" घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहिले असता तरुणांच्या सोबत असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीसोबत असलेले दोन्ही तरुण फरार झालेले दिसले.


घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. श्र्वानाने कवठळ पर्यंत जात आरोपींच्या पळून जाण्याचा मार्ग दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून मृतक तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचे विविध पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.