BIG BREAKING आमदार श्वेताताई महाले यांच्या बॉडीगार्डने स्वतःवर घातली गोळी....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अतिशय मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. थोड्या वेळापूर्वीच बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 
 अजय गिरी आज कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता ताई महाले पाटील यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले आहे. त्या बंदुकीतूनच त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचे वृत्त आहे. सध्या गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी गिरी यांचा मृत्यू झाल्याच्या घोषित केले.