BIG BREKING एवढे होऊनही अक्कल गहाण! मेरा खुर्द गावात पुन्हा तणाव; औरंगजेब, अफजलखानाचा पुळका! छत्रपती शहाजी राजे आणि शिवाजी महाराजांबद्दल घाणेरडी पोस्ट! शिवभक्त आक्रमक...

 
Andhera
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २० फेब्रुवारीला चिखली तालुक्यातील मेरा खुर्द गावच्या सलमानसह त्याच्या साथीदारांना औरंगजेबाचा पुळका आला होता. सोशल मीडियावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना अटक केली होती. सध्या त्या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना आज,२६ फेब्रुवारीला मेरा खुर्द च्या एकाला आणखी अफजलखान, औरंगजेबाचा पुळका आलाय. छत्रपती शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विकृत समाजकंटकाने इंस्टाग्रामवर अवमान जनक पोस्ट केली केली आहे.
याबद्दलची माहिती मिळताच शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहे. २० फेब्रुवारीच्या घटनेमुळे अजूनही मेरा खुर्द गावात तणाव आहे. गेल्या ६ दिवसांपासून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ६ दिवसांपासून मेरा चौकीवरील सर्व दुकाने बंद आहेत.  अशातच आज पुन्हा एका समाजकंटकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तणाव निर्माण झालाय. परिसरातील शिवभक्त सध्या अंढेरा पोलीस ठाण्यात जमले असून तक्रार देणे सुरू आहे.