BIG BREAKING संग्रामपुरात मोठा दरोडा! एटीएम मध्ये होते १७ लाख, सगळेच लांबवले...
Jan 7, 2024, 08:03 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूरातून भल्या पहाटे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकलाय..तब्बल १७ लाख रुपयांची रोकड लंपास असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रामपूर मधील एक एटीएम अज्ञात दरोडेखोरांनी फोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. एटीएम मध्ये १७ लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून दरोडेखोरांचा माग काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे..