BIG BREAKING गाडीच्या काचा फोडून पळवली ९ लाखांची रोकड! देऊळगाव माळी बस स्थानकावरील घटना

 
Fghv
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: अनिल मंजुळकर) येथील बस स्थानक परिसरात गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच भोवले. लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडून   तब्बल ९ लाखांची रोकड पळवल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवारच्या दुपारी घडली. 

संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी आज  मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची रोकड काढली होती. त्यांनतर दोघा अज्ञातांनी दुचाकीने पाठलाग सुरू केला होता.  असे संतोष लध्दड यांनी सांगितले दरम्यानच देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली.  संपूर्ण प्रकार उघडकीस येतात संतोष यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये मोटरसायकलवर चोरटे पसार झाल्याचे दिसत आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील मेहकर पोलीस स्टेशनचे राजेश शिंगोटे करत आहेत.