BIG BREKING! महाराष्ट्रात राहून छत्रपतींशी गद्दारी; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस्! औरंगजेबाचा पुळका! मेरा खुर्द गावात तणाव, संचारबंदी सदृश्य परिस्थिती..

 
Gvjk
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रात राहूनही इथल्या मातीशी इमान  ठेवण्याऐवजी एकाला औरंगाजेबाचा पुळका आला. "बाप तो बाप होता है" अशा आशयाचे औरंगजेबाचा गौरव होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे स्टेटस त्याने ठेवल. अखेर यामुळे तणाव निर्माण झाला. चिखली तालुक्यातील मेरा खुर्द गावात आज,२० फेब्रुवारीच्या सायंकाळी काही दुकाने फुटली. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून ५ ते ६ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

Pratap

            जाहीरात 👆

मेरा खुर्द येथील एका विशिष्ट समाजाच्या समाजकंटक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल असे स्टेटस ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना याबद्दलची माहिती मिळताच संतप्त प्रतिक्रिया उलटली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास काही दुकानांची तोडफोड झाली. 

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी धाव घेतली. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला असून सध्या संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी शांततेचे आवाहन केले असून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.