BIG BREAKING ! दिवसाची सुरूवात वाईट बातमीने; मेहकर सिंदखेडराजा रस्त्यावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; ७ जण जागीच ठार; १५ ते १६ प्रवाशी गंभीर जखमी!

आज सकाळची घटना! वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचा मृत्यू
 
accident
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आज, २३ मे च्या दिवसाची सुरुवातच वाईट बातमीने झाली आहे. काल,२२ मे चा दिवसही जिल्ह्यासाठी वाईट बातमी घेऊन उजाडला होता.शेगावात भाविकांच्या क्रुझरचा अपघात होऊन ४ भाविकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आज त्यापेक्षा मोठा अपघात  मेहकर सिंदखेडराजा मार्गावरील पळसखेड चक्का गावाजवळ घडला. कंटेनर आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन ७ जण जागीच ठार झाले तर १५ ते १६ गंभीर जखमी आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

प्राप्त माहितीनुसार अपघातग्रस्त बस मेहकर आगाराची रातराणी बस आहे. पुण्यावरून बस मेहकर कडे येत होती. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास बस आणि मेहकरकडून येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी बसचा चालक, कंटेनरचा चालक, ३ महिला आणि २ पुरुष अशा ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय १५ ते १७ प्रवाशी गंभीर जखमी आहेत. अपघातात ठार झालेले बहुतांश जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

मदत न मिळाल्याने तिघांचा मृत्यू..!

पळसखेड येथील बालाजी सोसे यांच्या घरापासून काही मीटर अंतरावर ही घटना घडली. अपघात झाल्यावर ५ मिनिटांच्या आता बालाजी सोसे तिथे पोहचले. अपघाताची भीषणता पाहून त्यांनी तात्काळ सिंदखेडराजा पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांना फोन केले. मात्र प्रशासनाची यंत्रणा तिथे पोहचायला ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. तोपर्यंत स्थानिकांनी जखमींना बाहेर काढले.  अपघातात मृत झालेली एक महिला माझ्या भावाला फोन लावा असे म्हणत होती, बोलत होती मात्र वेळेवर प्रशासनाची यंत्रणा मदतीसाठी पोहचली नाही त्यामुळे आमच्या डोळ्यादेखत आम्ही महिलेचा मृत्यू होतांना बघितला असे बालाजी सोसे यांनी बुलडाणा लाइव्ह ला सांगितले.वेळेवर मदत मिळाली असती तर तिघांचा जीव वाचला असता असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. घटनास्थळापासून सिंदखेडराजा पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ ६ कमी अंतरावर आहे मात्र एवढे असूनही यंत्रणा वेळेवर पोहचली नाही. अपघातात एसटी बसचे चालक जागेवर ठार झाले आहेत, राजू ती. कुलाल असे चालकाचे नाव असून ते वडगाव तेजन येथील राहणारे आहेत तर वाहक पी.आर.मुंढे दुसरबीड हे गंभीर जखमी आहेत. अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे अद्याप कळू शकली नाही.